Price: ₹200 - ₹149.00
(as of Dec 19, 2024 14:24:43 UTC – Details)
शेअर बाजारात गुंतवणूक करू पाहणार्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन मार्गाचा शोध घेणार्या इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचकांना शेअर बाजाराविषयी अत्याधुनिक माहिती हे पुस्तक देते.
एखादी भव्य इमारत उभी करण्यापूर्वी वास्तुविशारद तिचा तंतोतंत नकाशा रेखाटतो आणि त्यानंतर अभियंता तिला दृश्य स्वरूपात आणतो. याच तत्त्वानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर बाजारात ट्रेड करण्यापूर्वी रणनीती आखणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक सल्ला या पुस्तकातून मिळतो.
किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन या पुस्तकातून मुद्देसूदपणे केले आहे. शेअर मार्केटमधील इंट्रा डे, ऑप्शन ट्रेड, स्विंग ट्रेड इ. गुंतवणुकीच्या प्रकारांवर लेखक आपल्याला प्रभावी पद्धतीने तरीही मनोरंजक शैलीत मार्गदर्शन करतात.
प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार 41 क्लृप्त्यांमधून सांगितले आहे.
या पुस्तकातील प्रत्येक विचार आणि संदेश गुंतवणूकदाराच्या मनात प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा विश्वास जागवतो.
From the Publisher
Share Bazar : Share Market : शेअर मार्केट, शेअर बाजार – शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची 41 सूत्रं
शेअर बाजारात गुंतवणूक करू पाहणार्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन मार्गाचा शोध घेणार्या इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचकांना शेअर बाजाराविषयी अत्याधुनिक माहिती हे पुस्तक देते.
एखादी भव्य इमारत उभी करण्यापूर्वी वास्तुविशारद तिचा तंतोतंत नकाशा रेखाटतो आणि त्यानंतर अभियंता तिला दृश्य स्वरूपात आणतो. याच तत्त्वानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर बाजारात ट्रेड करण्यापूर्वी रणनीती आखणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक सल्ला या पुस्तकातून मिळतो.
किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन या पुस्तकातून मुद्देसूदपणे केले आहे. शेअर मार्केटमधील इंट्रा डे, ऑप्शन ट्रेड, स्विंग ट्रेड इ. गुंतवणुकीच्या प्रकारांवर लेखक आपल्याला प्रभावी पद्धतीने तरीही मनोरंजक शैलीत मार्गदर्शन करतात.
प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार 41 क्लृप्त्यांमधून सांगितले आहे.
या पुस्तकातील प्रत्येक विचार आणि संदेश गुंतवणूकदाराच्या मनात प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा विश्वास जागवतो.
प्रास्ताविक
2005 मध्ये जेव्हा मी शेअर बाजारात प्रवेश केला तेव्हा मीदेखील इतर सर्वसाधारण गुंतवणूकदारांप्रमाणेच अतिशय नवशिका गुंतवणूकदार होतो; परंतु मी एकच जाणत होतो की, कोणतेही काम हे परमेश्वराचे काम समजून परमेश्वराची पूजा करावी तसे केले पाहिजे.
म्हणूनच मी नेहमी असं समजत असे की, मी स्वत:साठी‘ट्रेड’ करत नाही तर त्या परमात्म्याने माझ्यावर सोपवलेले हे काम आहे आणि मला ते यशस्वीरीत्या पूर्ण करायचे आहे.
केवळ या प्रेरणेतून आणि विश्वासावर मी माझ्या प्रत्येक चुकीतून शिकत गेलो. 2009 मध्ये माझ्या या अनुभवांना ‘शेअर जीनियस’ या ब्लॉगच्या माध्यमातून मी इतरांसमोर मांडू लागलो. जेव्हा हा ब्लॉग सर्वसामान्य वाचकांकडून वाचला जाऊ लागला, त्याची भरभरून प्रशंसा होऊ लागली, ते बघून मला अधिक उत्तेजन मिळाले. अर्थातच, माझ्याही नकळत माझ्या या ‘शेअर जीनियस’ ब्लॉगचे 71000 फॉलोअर्स झाले.
सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) किंवा भारतीय विनिमय आणि प्रतिभूती मंडळ, जी भारताच्या भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे, तिने 2014 मध्ये ‘रिसर्च अॅनालिस्ट रेग्युलेशन 2014 अस्तित्वात आणला. याचा अर्थ सेबीमध्ये नोंदणी केल्याशिवाय किंवा एन.आय.एस.एम. मधून संशोधन अभ्यासक किंवा रिसर्च अॅनालिस्ट म्हणून परीक्षा उत्तीर्ण झाल्याखेरीज कोणतीही व्यक्ती ब्लॉग अथवा यू-ट्यूबच्या माध्यमांतून शेअर बाजारातील क्प्त्या सांगू शकत नाही. तेव्हा सरकारी नियमांचा आदर करत मी माझा ब्लॉग आणि यू-ट्यूब ही माध्यमे बंद करत असल्याची घोषणा केली. माझ्या बहुतेक अनुयायांनी यावर मला ई-मेलद्वारे कळवले की, मी ही रिसर्च अॅनालिस्टची परीक्षा देऊन सेबीकडे रिसर्च अॅनालिस्ट किंवा संशोधन अभ्यासक म्हणून माझी नोंदणी त्वरित करून घ्यावी, जेणेकरून माझ्या ब्लॉग व यू-ट्यूबवर सांगितल्या जाणार्या क्प्त्यांवर त्याचा परिणाम होणार नाही; तसेच2009 पासून मी मांडत आलेल्या या विनाशुल्क क्प्त्यांचा लाभ घेणारा माझा सारा दर्शक वर्ग शेअर बाजारासंबंधी ज्ञानापासून वंचित राहणार नाही.
आणि अशा रीतीने मी एका छोट्या गुंतवणूकदारापासून एक रिसर्च अॅनालिस्ट झालो. हे पुस्तक लिहिणे ही मी माझी एक प्रकारे जबाबदारी समजतो; कारण ही माहिती वाचणारा कोणताही वाचक मला अशा प्रकारे प्रशिक्षित करावयाचा आहे की, या पुस्तकाच्या प्रेरणेमुळे तो शेअर बाजारात हमखास यशस्वी होईल.
पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणि व्यापार (ट्रेड) करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निवेश किंवा गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक न वाचता टे्रड (व्यापार) करून अधिकाधिक नफा कसा मिळवता येईल हा दृष्टिकोन ठेवूनच वाचकांनी हे पुस्तक वाचावे; कारण हे पुस्तक त्याच दृष्टिकोनातून लिहिले गेले आहे.
– महेश चंद्र कौशिक
रिसर्च अॅनालिस्ट
जे. जे. कॉलनी, पिंडवाडा- 307 022
जिल्हा सिरोही, राजस्थान
महेश चंद्र कौशिक
विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हा कलेक्टर कार्यालयात कार्यरत आहेत.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First Edition (1 August 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 168 pages
ISBN-10 : 9352203283
ISBN-13 : 978-9352203284
Item Weight : 180 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book