Price: ₹450 - ₹274.00
(as of Oct 24, 2024 16:52:52 UTC – Details)
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे, हे निश्चित!
From the Publisher
Bandhawarchya Babhali by G. D. Madgulkar
गण्यानं मार खा खा खाल्ला. घरच्या बाईलीला कागद लिहिला. लिह़िला कागद तपासाला आला. तपासणारा साहेब लाल झाला.कागदात असं होतं काय? “लेकरांच्या मावली, धुंडून काढ. रानात आहे वडाचं झाड. झाडाची सावली सरते तिथं. सोनं गावंल अर्धं पोतं. सात हात खाली खण. सापडलं तरी नाहीच म्हण. खाली धरती वर आभाळ. तुझी लेकरं तूच सांभाळ!”
कागद बाईलीला पोचला नाही. तिने काही वाचला नाही. ती बिचारी चिंतेत होती. तिची बुडाली होती शेती. नांगरणीवाचून पेरा कुठला? तिचा पुरता धीर सुटला. होतं त्यात आणखी वाढ. पोलिसांची आली धाड. पोलीस लोकांनी काय केलं. वडाचं झाड शोधून काढलं. त्याच्या फांद्या लांब गेल्या. एकरभर पडती सावल्या. पोलीस म्हणती खूण पकडा. लपलं सोनं शोधून काढा. पोलीस बसले माती उपसत. सावली गेली आकसत आकसत. सावलीमागं पोलीस धावले, उखडून उखडून पुरते भागले. त्यांची मेहनत वाया गेली. जमीन सारी खांदून झाली. चकवा चकवा म्हणत म्हणत, पोलीस गेले तणतणत.
दुसर्या दिवशी बाईल उठली. तुरुंगात जाऊन गण्याला भेटली. गण्या म्हणाला, “छान झालं. सारं रान नांगरून गेलं. आता बघून वाफसा. जोंधळा पेर पसापसा. एक साल ठीक जाईल. तंवर माझी सुटका होईल.”
मागची पिढी अडाणी. आजची पिढी शहाणी. शिक्षणानं काय केलं. चोरांनाही चातुर्य आलं.
-प्रस्तुत पुस्तकातून
त्या वैभवशाली आवारातून बाहेर पडलो. घामाघूम होऊन बाहेर पडलो. माझी कानशिले ताडताड उडू लागली होती. तोंडात शुष्कता आली होती. सकाळची उन्हे-दुपारी व्हावीत तितकी कडक झाली होती. त्या उन्हातून, तशा अवस्थेतच मी झपाझप चालू लागलो. मेंदूतले चक्र जोराने फिरू लागले. कुठूनतरी एक विलक्षण आवाज बजावल्यासारख्या स्वरात मला आणखी तापवू लागला. मी चालत होतो. तो बोलत होता -चूक केलीस. त्याला आवडेल तसे लिहिले असतेस तर पैसा मिळाला असता. याच स्वभावाने भिकारी झालास. चालणार्या गोष्टी चित्रित केल्याशिवाय त्यांचे तरी कसे चालणार-? ती सरला जोशी कोण होती आणि कोण झाली?
काय म्हणताय तुम्हालाही जाणून घ्यायचंय. मग त्यासाठी तर तुम्हाला ‘बांधावरच्या बाभळी’ हे पुस्तक वाचायला हवं.
Thorli Patee by G. D. Madgulkar
गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा. प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील एक कोपरा ज्या काही निवडक व्यक्तिमत्त्वांसाठी आजन्म राखीव असतो, त्यापैकी एक असं हे व्यक्तिमत्त्व. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या या महान साहित्यिकाच्या लेखणीनं रसिकांवर अनेक दशकांपासून अक्षरश: गारूड केलं आहे.
गदिमा हे खऱ्या अर्थानं नक्षत्रांचं देणं होतं. अनेक दशकांपूर्वी त्यांनी केलेलं लिखाण आजही तितकंच ताजंतवानं वाटतं. आयुष्याचे अनेक पदर उलगडणाऱ्या त्यांच्या कथांमधील शब्द वाचकांना नवीन दृष्टी तर देतातच; पण या कथांच्या प्रत्येक दोन ओळींमधलं अवकाश वाचकांच्या अव्यक्त भावनांना अचूक रेखाटतं.
त्यांचे अनेक कथासंग्रह रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत. ‘थोरली पाती’ या त्यांच्या कथासंग्रहात एकूण 25 कथा असून या पुस्तकाचं संपादन मराठी साहित्यातील आदरणीय नाव असलेल्या पु.भा. भावे यांनी केलं आहे. या पुस्तकाला त्यांची प्रस्तावनाही लाभली आहे. यातील साऱ्या कथांची निवड पु. भा. भावेंनीच केलेली आहे.
मन भारून टाकतात. प्रस्तुत पुस्तकातील कथा वाचताना वाचकांना ही गोष्ट पदोपदी जाणवल्याशिवाय राहत नाही.
मुंबईतली सकाळ सांगण्याइतकी सुंदर कधीच नसते. आज मात्र खरेच एक छान सकाळ उगवली. ओलीवर पडलेली उन्हे निसण्यावरच्या कणसांच्या रेघांसारखी रम्य दिसू लागली. रेल्वे प्लॅटफॉर्म सोडून, गोपीनाथ चालत चालत थोडका वर आला. रंगाऱ्याच्या चाळीच्या भिंतीच्या समांतर असलेल्या लोहमार्गावर येऊन उभा राहिला. आता त्याच्या अंगावर तिकीटचेकरचा पांढरा वेष होता. त्या वेषात किशीने त्याला कधीच पाहिला नव्हता. तो काय नोकरी करतो तेही तिला माहीत नव्हते.
गोपी वर पाहत होता. किशी खाली पाहत होती. नजरेच्या काड्या भराभर जमल्या. होता होता घरकूल पुरे झाले. दोन पाखरे आत विसावली. एकमेकांच्या उबेत अगदी अबोल बसली. पंखांची हालचालदेखील नकोशी झाली. इतकी शांतता आणि समाधी त्यांना साधली. वेळेची जाण राहिली नाही. सादाचे ज्ञान राहिले नाही. चार डोळ्यांवाचूनची दुनिया जणू नाहीशी झाली. खालचे दोन डोळे वर उडाले होते. वरच्या दोन डोळ्यांनी त्यांना आपल्या उबेत घेतले होते.
एकदम सोसाट्याचा वारा यावा तशी एक लोकलगाडी मुंबईच्या बाजूने दणाणत आली. गोपीला ते कळले नाही. किशीला ते उमगले नाही. डोळ्याचे पाते लवते ना लवते एवढ्यात लोकलच्या मस्तकाने गोपीच्या शरीराला हुंदाडा मारला. किशी जोरात किंचाळली. गाडी त्याच गतीने पुढे निघून गेली. एका सुकुमार तरुण देहाचे छिन्नविच्छिन्न तुकडे झाले. ऊन ऊन रक्ताच्या शिंतोड्यांनी थंडगार लोखंड भिजून निघाले.
किशी-गोपीनाथची मुकी प्रेमकहाणी मुकीच राहिली. चाळीतल्या भिंतींना आणि खिडक्यांना सारे माहीत आहे, पण त्यांनाही वाचा नाही.
– प्रस्तुत पुस्तकातून
Book Review
“कथावाङ्मयाचा वाचकवर्ग सारखा वाढत असता चांगल्या वाइटाची जाण असणाऱ्या गुणी लेखकाने ललित साहित्यातील उत्तमत्वाचा ध्वज उभा ठेवणे आज फार आवश्यक आहे. वस्तुत: जुने आणि नवे, ह्यापेक्षाही उत्तम आणि अधम, भव्य आणि क्षुद्र, सरस आणि नीरस हाच भेद अधिक महत्त्वाचा आहे. जे सरस व उत्तम आहे; ते कधी जुने होत नाही. अशा सरस कथा माडगूळकरांनी लिहिल्या आहेत. घटनाप्रधान कथा, मनोविश्लेषणात्मक कथा-व्यक्तिचित्रे, प्रेमकथा, भूतकथा, साऱ्याच आपापल्या परीने चांगल्या असू शकतात. मराठी लघुकथेचा संसार संपन्न करावयास त्या सार्यांचीच आवश्यकता आहे. माडगूळकरांच्या कथासाहित्यातून विविध प्रकारच्या पंचवीस कथा येथे मी निवडल्या आहेत. ह्या सर्व कथा अर्थात एकाच तोडीच्या किंवा जातीच्या नाहीत. ‘मुकी कहाणी’सारख्या प्रेमकथेपासून ‘रामा बालिष्टर’सारख्या चुटक्यापर्यंत अनेक ढंगाच्या व जातीच्या, आपापल्या परीने चांगल्या कथा वेचण्याची-वैशिष्ट्याची दृष्टी ठेवली आहे. ह्या कथांच्या वाचनाने मला अमूप आनंद दिलेला आहे. तोच आनंद मिळविण्यासाठी वाचकांनी आता ह्या थोरल्या पातीचे पान उलटावे.”
– पु. भा. भावे
गजानन दिगंबर माडगूळकर
गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली. आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, ललितलेख, लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णन, चित्रपटकथा, काव्य आदी साहित्यकृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे.
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Add to Cart
Customer Reviews
4.6 out of 5 stars
294
4.4 out of 5 stars
118
4.5 out of 5 stars
21
4.4 out of 5 stars
40
4.6 out of 5 stars
577
4.0 out of 5 stars
58
Price
₹138.00₹138.00 ₹270.00₹270.00 ₹132.00₹132.00 ₹145.00₹145.00 ₹146.00₹146.00 ₹120.00₹120.00
ASIN : B08PL4V321
Publisher : Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2018)
Language : Marathi
Item Weight : 410 g
Dimensions : 20.3 x 25.4 x 4.7 cm