Kanmantra Aai Babansathi [Kanmantra for Mom and Dad]

Kanmantra Aai Babansathi [Kanmantra for Mom and Dad]

Kanmantra Aai Babansathi [Kanmantra for Mom and Dad]
Price: ₹0.00
(as of Mar 18, 2025 20:22:20 UTC – Details)


आई-वडील हे मुलांचे पहिले गुरु असतात. मुलांचं उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यात पालाकांचा वाटा सिंहाचा असतो. मात्र, त्यासाठी प्रथम पालकांनी सक्षम, विचारी, सुजाण असावं लागतं, पालकांचं व्यक्तिमत्व कोण घडविणार? मनोज अंबिके यांनी सुजाण पालक घडविण्यासाठी या पुस्तकातून मार्गदर्शन केलं आहे. मुलांना मिळणारे यश, पालकांच्या जमाती, मुलांनी पालकांचे ऐकावे का? मोठेपणी मुलांनी काय बनावं?, मलाही आदर हवा, मुलांच्या मनातले ओळखायचे तंत्र, नेतृत्वगुणाचा विकास, मुलांचं टीव्ही पाहाणं बंद कसं करावं?, मुलांचा हट्टीपणा दूर कसा करावा अशा प्रश्नांचा वेध पुस्त्कातून घेतला आहे. मुलांना मिळणारे यश पालकांसाठी आनंदाची, समाधानाची बाब असते. यश मिळवण्यासाठी मुलांमध्ये गुणवत्ता विकसित व्हायला हवी. ती निर्माण होण्यासाठी संस्कार, मुलांमध्ये संतुलनाचे महत्व बिंबवणे. त्यांच्या विचारामध्ये बदल घडवून आणणे, विश्वासाचे नाते निर्माण करने, त्यांना पुरेसा वेळ देणे, त्यांच्यात स्वत:चे मत बनविण्याची क्षमता निर्माण करणे, त्या मताचा आदर करणे, आदी गोष्टी महत्वाच्या आहेत. याविषयीचे मार्गदर्शन मनोज अंबिके यांनी ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ मधून केले आहे. मुलांचे व्यक्तिमत्व फुलविण्याची, त्यांना घडविण्याची जबाबदारी प्रत्येक आई-बाबांची असते. त्यासाठी हे पुस्तक त्यांनी वाचलेच पाहिजे.

प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक…

* मुलांचा हट्टीपणा कसा दूर करावा?

* मुलांनी पालकांचे ऐकावे का?

* मुलांच्या मनातले ओळखयाचे तंत्र

* मुलांचं टीव्ही बघणं कसं बंद करावं?

* मुले अभ्यास का करतील?

* मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवावी?

* मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास

* पाल्यामध्ये आवश्यक असणारे 21 गुण

* पालकांच्या जमाती

Please note: This audiobook is in Marathi.

Author: ram kumar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *